अरेच्चा…आता फेसबुक सांगणार युजर श्रीमंत आहे की गरीब !

0

फेसबुकने युजरच्या आर्थिक स्थितीच्या अचूक माहितीसाठी एक स्वतंत्र प्रणाली विकसित केली असून याचे पेटंट मिळावे म्हणून अर्ज दाखल केला आहे.

बहुतांश सोशल शेअरिंग साईटकडे आपली इत्यंभूत माहिती जमा असते. यात फेसबुकसारख्या अजस्त्र सोशल साईटपासून तर काहीही लपून राहू शकत नाही. आता मात्र फेसबुकने याचाही पुढील पल्ला गाठण्याची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. फेसबुकने अलीकडेच पेटंट कार्यालयात एका पेटंटसाठी अर्ज दाखल केला आहे. यात कोणताही युजर हा गरीब आहे, मध्यमवर्गीय की श्रीमंत ? याची अचूक माहिती मिळू शकणार आहे. यासाठी फेसबुक हा प्रत्येक युजरच्या माहितीचे सखोल विश्‍लेषण करणार आहे. यात संबंधीत युजरची वैयक्तीक व व्यावसायिक माहिती, त्याची भौगोलिक स्थिती, शिक्षण, इंटरनेटचा वापर आदींचा समावेश असेल. याच्या जोडीला विविध वयोगटातील युजर्ससाठी प्रश्‍नावली तयार करण्यात आली आहे. यात भिन्न प्रश्‍नांचा समावेश असेल. म्हणजे २० ते ३० वयोगटातील युजर्सला त्यांच्याकडे असणार्‍या गॅजेटची माहिती विचारण्यात येईल. तर ३० ते ४० वयोगटातील युजर्सला त्यांच्याकडे स्वत:चे घर आहे की नाही ? हे विचारण्यात येणार आहे. याशिवाय संबंधीत युजरची ट्रॅव्हल हिस्ट्री, ई-शॉपींग साईटवरून केलेली खरेदी आदींच्या माहितीचादेखील यात वापर केला जाणार आहे. यानंतर या सर्व माहितीचे एका विशिष्ट प्रणालीच्या माध्यमातून विश्‍लेषण करण्यात येईल. यातून संबंधीत युजर हा नेमक्या कोणत्या सामाजिक व आर्थिक गटात मोडतो ? याची माहिती देण्यात येईल. सध्या फेसबुकने वर्कींग क्लास, मिडल क्लास आणि अप्पर क्लास अशा तीन वर्गांमध्ये युजर्सला विभाजीत करण्यात येणार असल्याची माहिती आपल्या पेटंटमध्ये दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here