अमेझॉन इंडियावरील विक्रेत्यांची संख्या पोहोचली तीन लाखांवर!

0
amazon

भारतीय ई-व्यापाराच्या क्षेत्रामध्ये आघाडीवर असलेल्या अमेझॉन इंडिया या ई-कॉमर्स कंपनीने भारतातील आपल्या पाच वर्षांहून कमी कार्यकालामध्ये तीन लाख विक्रेते जोडण्याचा लक्षणीय टप्पा गाठल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

विशेष म्हणजे नेल्सन पाहणीच्या निष्कर्षांनीही या गोष्टीला दुजोरा दिला आहे ज्यात अमेझॉन इंडिया ही विक्रेत्यांची सर्वाधिक पसंती मिळविणारी कंपनी म्हणून उदयास आल्याचे दिसून आले आहे. ही पाहणी भारतातील १६ शहरांमध्ये करण्यात आली व त्यासाठी विद्यमान विोते तसेच पुढील सहा महिन्यांमध्ये ऑनलाइन विाीचा पर्याय स्वीकारण्याची इच्छा असलेल्या विोत्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. या पाहणीत भाग घेतलेल्या विोत्यांपैकी ५० टक्के विक्रेत्यांनी अमेझॉन ही त्यांची आवडती वेबसाइट असल्याचे सांगितले. नेल्सन पाहणीतून असेही दिसून आले आहे की ६७ टक्के विोते अ‍ॅमेझॉनला आपल्या व्यापाराच्या विस्तारासाठीची संधी म्हणून पाहतात. महानगरांबाहेरील व छोट्या शहरांतील विक्रेत्यांना आपला ऑनलाइन व्यवसाय सुरू करण्यासाठी व त्याच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक ते सर्व पाठबळ सहज उपलब्ध व्हावे या हेतूने गेल्या वर्षभराच्या काळात अमेझॉन इंडियाने आपल्या थर्ड पार्टी अ‍ॅफिलिएट्स व सेवापुरवठादारांचे जाळे विस्तारले आहे. आज अमेझॉन वरील ६० टक्के विक्रेते आपल्या व्यापाराच्या व्यवस्थापनासाठी सेलर अ‍ॅपचा वापर करतात. याखेरीज देशभरातील ठिकठिकाणचे स्थानिक कलाकार, कारागिर, वीणकर यांनी ऑनलाइन विाीची वाट चोखाळावी व आपल्या व्यवसायाचा विस्तार करावा यासाठी त्यांना सक्षम बनविण्यासाठी कंपनीने अनेक सरकारी संस्थांबरोबरही हातमिळवणी केली आहे. लघु आणि मध्यम उद्योगक्षेत्रातील विक्रेत्यांसाठी गेल्याच वर्षी आपल्या कर्ज योजनेलाही सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here