अमेझॉनवरून मिळणार अल्काटेलचा टॅबलेट

0
अल्काटेल ३ टी ८ टॅबलेट, alcatel 3t 8 tablet

टिसीएलची मालकी असणार्‍या अल्काटेलने अल्काटेल ३ टी ८ हा किफायतशीर मूल्य असणारा टॅबलेट भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

भारतीय बाजारपेठेत एंट्री लेव्हलचे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात विकले जातात. अन्य उपकरणांमध्येही हाच ट्रेंड आहे. अर्थात टॅबलेट उत्पादनाच्या क्षेत्रातही किफायतशीर दरातील मॉडेल्सला वाढीव मागणी आहे. या अनुषंगाने अल्काटेल ३ टी ८ हे मॉडेलदेखील याच प्रकारातील आहे. याचे मूल्य ९,९९९ रूपये असून ग्राहकांना हा टॅबलेट अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. हे मॉडेल मेटॅलिक ब्लॅक या रंगाच्या पर्यायात खरेदी करता येणार आहे. यात ८ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजे १२८० बाय ८०० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यामध्ये मीडियाटेकचा क्वॉड-कोअर एमटी८७६५ ए हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे.

अल्काटेल ३ टी ८ हा टॅबलेट ८ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतेच्या अनुक्रमे मुख्य आणि फ्रंट कॅमेर्‍यांनी सज्ज आहे. यातल्या मुख्य कॅमेर्‍यातून फुल एचडी क्षमतेचे व्हिडीओदेखील घेता येणार आहेत. यात ४,०८० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारे आहे. कनेक्टीव्हिटीसाठी यात ब्ल्यु-टुथ, वाय-फाय, जीपीएस आदींसह हेडफोन जॅक, एफएम रेडिओ आदी फिचर्स दिलेले आहेत. याशिवाय यात किडस् मोड हे विशेष फिचर प्रदान करण्यात आले आहे. याच्या मदतीने कुणीही आपल्या मुलांच्या अ‍ॅप्स वापरावर नियंत्रण व लक्ष ठेवू शकणार आहे. तर आय केअर मोड या फिचरमुळे दीर्घ काळापर्यंत वापर करूनदेखील युजरच्या डोळ्यांवर ताण येणार नसल्याचा दावा कंपनीने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here