अप्रिलिया एसआर १२५ दुचाकीचे अनावरण

0

अप्रिलिया कंपनीने आपल्या अप्रिलिया एसआर १२५ या नवीन दुचाकीला भारतीय ग्राहकांसाठी सादर केले असून ऑटो एक्सपो-२०१८ मध्ये याचे अनावरण करण्यात आले.

व्हेस्पाच्या मालकीचा ब्रँड असणार्‍या अप्रिलियाने जाहीर केलेल्या एसआर १२५ या मॉडेलचे एक्स-शोरूम मूल्य ६५,३१० रूपये आहे. यात बाजारपेठेत आधीच उपलब्ध असलेल्या अप्रिलिया एसआर१५० या मॉडेलमधील बहुतांश फिचर्स असून फक्त रंगसंगतीसह काही अन्य फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यात १२५ सीसी क्षमतेचे एयरकुल्ड, ३ सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. याला सीव्हीटी गिअरबॉक्स संलग्न करण्यात आलेला आहे. याच्या पुढील चाकासाठी डिस्क ब्रेक तर मागील चाकासाठी ड्रम ब्रेक प्रदान करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही दुचाकी ग्राहकांना खरेदी करता येणार असल्याचे अप्रिलिया कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here