अँड्रॉईड आणि क्रोमचा होणार विलय

0

गुगलने आपल्या अँड्रॉईड आणि क्रोम या ऑपरेटींग प्रणालींना एकत्र करण्याचे निश्‍चित केल्याची माहिती असून यातून तयार झालेली नवीन ओएस पुढील वर्षी सादर करण्यात येणार आहे.

गुगलने स्मार्टफोन आणि अन्य उपकरणांसाठी अँड्रॉईड ही ऑपरेटींग सिस्टिम विकसित केली आहे. आज जगभरातील अब्जावधी उपकरणे यावर चालत आहेत. सध्या याची सहावी मार्शमॅलो ही आवृत्ती सादर करण्यात आली आहे. तर गुगलने काही वर्षांपुर्वी डेस्कटॉपसाठी क्रोम ही ऑपरेटींग सिस्टिम सादर केली होती. यावर आधारित संगणक, लॅपटॉप आणि टॅबलेट सादर करण्यात आले. अलीकडे मात्र अँड्रॉईड या प्रणालीवर कंपनीने जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. या पार्श्‍वभुमिवर आता गुगलने आपल्या अँड्रॉईड आणि क्रोम या ऑपरेटींग प्रणालींना एकत्र करण्याचे निश्‍चित केल्याची माहिती समोर आली आहे. यातून नवीन प्रणाली तयार करून ती पुढील वर्षी होणार्‍या गुगलच्या ‘आय/ओ’ परिषदेत सादर करण्यात येणार आहे. तर प्रत्यक्षात जगभरातील युजर्सला ही प्रणाली २०१७ साली सादर करण्यात येणार आहे.

अँड्रॉईड व क्रोमचा विलय करून नवीन प्रणाली तयार करण्याच्या वृत्ताला गुगलने दुजोरा दिला आहे. मात्र महत्वाची बाब म्हणजे यातून नवीन प्रणाली तयार होणार असली तरी भविष्यातही अँड्रॉईड आणि क्रोम या ऑपरेटींग सिस्टिम्स स्वतंत्रपणे कार्यरत राहतील असा दावादेखील करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here