अँड्रॉईडवर मल्टी विंडो सुविधा

0

अँड्रॉईडच्या आगामी आवृत्तीमध्ये एका वेळी दोन विंडोमध्ये वेगवेगळे ऍप वापरण्याची अर्थात मल्टी विंडो सुविधा मिळणार आहे.

पुढील वर्षी अँड्रॉईडचे ‘एन’ हे व्हर्शन येणार आहे. यात नेमके काय असेल याची माहिती अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी यातील एका फिचरबाबत गुगलचे अधिकारी ग्लेन मर्फी यांनी अधिकृत माहिती दिली आहे. यानुसार आगामी आवृत्तीमध्ये मल्टी विंडो ही सुविधा मिळणार आहे. ऍपलच्या ताज्या आयओएस प्रणालीत ही सुविधा प्रदान करण्यात आली आहे. अर्थात ती नवीन आयपॅडमध्ये प्रदान करण्यात आली आहे. मायक्रोसॉफ्टच्या सरफेट टॅबमध्येही याच स्वरूपाचे फिचर देण्यात आले आहे. या पार्श्‍वभुमिवर अँड्रॉईडच्या आगामी आवृत्तीत ही सुविधा आल्यास गुगलच्या पीक्सल सी या टॅबलेटमध्येही हे फिचर सादर करण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here