अँड्रॉईडला बाय करण्यासाठी अॅपलचे अॅप

0

कोणत्याही युजरला अँड्रॉईड प्रणालीवरून आयओएसवर सुलभपणे शिफ्ट करता यावे यासाठी अॅपलने चक्क ‘मुव्ह टू आयओएस’ या नावाने ‘गुगल प्ले’वर अॅप लॉंच केले आहे.

move_to_ios

सध्या अँड्रॉईड आणि आयओएस प्रणालीमधील युध्द निर्णायक वळणावर पोहचले आहे. अॅपलने खूप प्रयत्न करूनही जगातील जवळपास ७८ टक्के मोबाईल उपकरणे हे अँड्रॉईड या प्रणालीवर चालणारी आहेत. अँड्रॉईड ही लिनक्स या ओपनसोर्स सिस्टिमवर आधारित असल्याने ती अत्यंत लवचीक आहे. यात सातत्याने उत्तमोत्तम फिचर्स येत असतात. सर्वात महत्वाची बाब म्हणजे गुगलने ती सर्वांसाठी खुली केली आहे. परिणामी अँड्रॉईडचा वापर करून अन्य ऑपरेटींग प्रणालीदेखील (उदा. सायनोजेनमोड) विकसित करण्यात आल्या आहे. या पार्श्‍वभुमिवर ग्राहकांना अँड्रॉईडपासून दुर करण्यासाठी अॅपल कंपनीने एक अफलातून शक्कल लढविली आहे. याची चुणूक अॅपलच्या या वर्षाच्या पुर्वार्धात झालेल्या डब्ल्यूडब्ल्यूडीसी या वार्षिक परिषदेत दिसून आली होती. यात अॅपलने आपण भविष्यात अँड्रॉईडच्या ग्राहकाला आपल्या स्मार्टफोनवरील सर्व डाटा सहजपणे अॅपलच्या आयफोन, आयपॅड वा आयपॉड या उपकरणांवर शिफ्ट करण्यासाठी अॅप सादर करण्याची घोषणा केली होती.

या घोषणेनुसार ऍपलने अँड्रॉईडवर ‘मुव्ह टू आयओएस’ हे अॅप सादर केले आहे. अॅपलचे हे आजवरचे एकमेव अँड्रॉईड ऍप आहे. याच्या मदतीने अँड्रॉईड फोनवरील फोटो, संगीत, व्हिडीओ, कॉन्टॅक्ट लिस्ट, एसएमएस, ई-मेल्स आदी सर्व माहिती आयओएसवर शिफ्ट करता येते. कुणीही नवीन आयफोन, आयपॅड वा आयपॉड टच हे उपकरण घेतले असता यात आपल्याला अँड्रॉईड फोनवरील डाटा ‘इंपॉर्ट’ करायचा आहे का? असा प्रश्‍न विचारण्यात येतो. यासाठी अँड्रॉईड फोनवर ‘मुव्ह टू आयओएस’ हे अॅप डाऊनलोड करावे लागते. यातून मिळालेला दहा आकडी कोड नंतर अॅपलचा उपकरणात टाकावा लागतो. यानंतर आपला आधीचा अँड्रॉईड फोन आणि ऍपलचे नवीन उपकरण हे वाय-फायच्या माध्यमातून कनेक्ट होते. यानंतर काही मिनिटांमध्ये आधीच्या स्मार्टफोनवरील संपुर्ण डाटा हा अॅपलच्या गॅजेटमध्ये सेव्ह करण्यात येतो. अर्थात ते उपकरण आपण आपल्या अँड्रॉईड स्मार्टफोनवरील सर्व माहितीसह वापरू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here